AKSHAY DHANDAR

  1. दुनिया माझी निराळी....

    शब्दांची फुल,
    अन शब्दांच्याच वेली...
    शब्दांची हि दुनिया...
    हि दुनिया माझी निराळी...

    आसवांची नदी,
    त्यात भावनांची होडी...
    भावनांच्या होडीसाठी,
    शाहीची काडी ...

    टीम टीमनार चांदण,
    त्याला चंद्राची ओड...
    त्याच राती फुलणारी रातराणी,
    ती रातराणी..
    बघ हस्ते किती गोड...

    निराळ्या ह्या दुनियेत,
    आहे निराळ सार काही...
    पाखरांच्या ओठी,
    आहे तुकोबांची ओवी...

    निराळ्या ह्या दुनियेला,
    आहे कल्पनेची जोड...
    अन ह्याच कल्पनेच्या दुनियेत फिरणारा मी,
    फिरणारा मी ...
    आहे एक चोर...
    आहे एक ....
    ..... कल्पनांचाच चोर....