Aakash Ubale

मित्रां मधे रमणारा....
मैत्री साठी जगनारा....
सुट्टी मिळाली की गाडीला KICK मारून निसर्गाकड़े धाव घेणारा.....
बाकीचे दिवस कंप्यूटर आणि मोबाइल वर रंगनारा.....
मी असाच.....
मित्रां मधे रमणारा.......
मैत्री साठी जगनारा..........

'मी' एक उनाड वारा,
पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . .

'मी' एक खळखळणारा झरा,
पण पावसातच वाहणारा . . .

'मी' एक उत्तुंग श्वास,
पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . .

'मी' एक नाजुक भावना,
पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . .

'मी' जबाबदारीने वेढलेला,
पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . .

'मी' एक थकलेले झाड,
पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . .

'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन,
पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . .

'मी' कोण ? , 'मी' काय ?
पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . .

तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक,
तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला,
कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . .---------------------------
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नाहीतर नीघून जा...