धुंद रवी .....................
कधी कधी धुंदीतुन सावरतो तेंव्हा विचार करतो की मी नक्की कोण आहे...
वळिवाच्या अल्लड पावसाचा एक मस्तवाल थेंब ? का...
तिच्या केसातल्या ओल्या वीणेवर, त्याच्या शापीत बोटांनी छेडलेला मोहाचा राग ?
स्वत:वरंच भाळून चढलेल्या नशेमुळं उठणारा रातराणीच्या श्वासातला गंध ? का...
आपल्या उन्मत्त गंधाच्या अस्मितेनं माजलेला एक बेफाम मोगरा... ?
किंवा... ओल्याचिंब धुक्याची जहाल बरसात, चांदण्यांच्या ओठातुन पिऊन झिंगणा-या रात्रीला सावरणारा स्वच्छंदी ढग आहे मी ?
मी नक्की कोण आहे ?
मनस्वी वणवा... रिमझीम पाऊस.... हळवा प्राजक्त.... की वाद्ळी उन्माद ?
पण ह्या सगळ्याची उत्तरं सापडता सापडता पुन्हा कसलीतरी धुंदी चढते.... आणि मग...
मोठ्या मुश्किलीनं मलाच सापडलेला मी पुन्हा हरवुन जातो....
थोडक्यात... 'मी कोण' हा प्रश्न अनुत्तरीतच !