Laxmi More

Natural Farmer in Chaundhane, Baglan, Nashik

कृषिभूषण सौ.लक्ष्मी मोरे, शेतीतील तेजस्वी शलाका.

विषमुक्त शेतीच्या मार्गावर चालत चिरंतन प्रकाशदीप तेवत ठेवणारी एक स्निग्ध प्रकाश ज्योत म्हणजेच कृषिभूषण सौ लक्ष्मी मोरे.नैसर्गिक शेतीसाठी झटणारी, ग्रामीण भागातील प्राथमिक सुविधा वंचित असलेल्या शालेय मुलांसाठी व शिक्षणासाठी अविरत धडपडणारी, व्रतस्थ नैसर्गिक शेती अभ्यासक आणि प्रसारक,साधी जीवनशैली जगणारी सात्त्विक व्यक्तिमत्वाची लक्ष्मी मोरे म्हणजे शेतीतील शलाका जणू ! मुळात त्यांचा पिंड शेतीत निरनिराळे प्रयोग करण्याचा ! यासाठी त्यांनी नैसर्गिक शेतिचे बारकावे, तंत्र, आत्मसात केलेले आहेत.या त्यांच्या नैसर्गिक शेतीच्या प्रवासात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग मधील विविध पदावरील, अधिकारी व कर्मचारी तसेच नैसर्गिक शेतीचे प्रचारक पद्मश्री सुभाष पालेकर आदींचे मोलाचे मार्गदर्शक लाभले.त्यासाठी त्या शासनाच्या विविध उपक्रमात भाग घेऊन स्वतःला स्वयंपूर्ण केले.पारंपारिक शेतीमधील आरोग्यास धोकादायक अशा रासायनिक खते आणि औषधे यांचे दुष्परिणाम ओळखून आता आपण अशा शेतीचा त्याग केला पाहिजे असा विचार करून, आपली भूमातेचे, पर्यावरणाचे रक्षण,जैव विविधता चे रक्षण,पाण्याचे काटेकोर नियोजन यासाठी त्या सदैव कार्यरत आहेत.अशा या आध्यात्मिक शेती कन्येची यशोगाथा.
लक्ष्मी मोरे यांचा जन्म वटार,तालुका बागलाण जिल्हा नासिक येथील शेतकरी कुटुंबातील असल्याने मुळात शेतीचा अनुभव आणि आवड,शालेय शिक्षण सांभाळून शेती पूरक अशी मदत करणे घरातील जबाबदारी सांभाळणे हे जणू ओघानेच आले.सातवीपर्यंत चे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्या शेजारील चौन्धाने येथील हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला,दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करीत असता त्या कालीन प्रथे प्रमाणे त्याच गावातील उच्च शिक्षित अशा मधुकर मोरे यांचे सोबत लग्न झाले.सासर आणि माहेर अशा दोन्ही ठिकाणी सुधारणा वादी विचारसरणी आणि दोन्ही ठिकाणी शेती व्यवसाय याची छान सांगड अपोआप जुळली गेली.नोकरी निमित्त ठाणे आणि मुम्बई जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राहण्याचा योग आला,मुळात जिद्दी स्वभाव शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी लग्न झाल्यावर व दोन अपत्ये झाल्यावर आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करीत त्या समाजशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले,शिवाय मार्केटिंग मधील पदविका सुद्धा प्राप्त केली.
दोन्ही मुले मोठी झाल्यावर आपल्या शिक्षणास पूरक होईल असा व्यवसाय करावा या द्वारे इतरांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे या प्रेरणेने त्यांनी आपली परंपरा असलेल्या पैठणी साडीचा व्यवसाय उभा केला त्याद्वारे पैठणी निर्माण करणाऱ्या विणकरांना मुंबई मध्ये मार्केट उपलब्ध करून दिले,या साठी अनेक प्रदर्शने करून व्यावसायिकांना मार्केट उपलब्ध करून दिले.हे चालू असतांना मुंबई मधील नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिला वर्गाचे जीवन सुखकर व्हावे या उदात्त विचाराने त्यांना निवडलेला ताजा अनुरूप कापलेला भाजीपाला घरपोच दिला तर त्यांचा खूप वेळ वाचेल हा विचार करू लक्ष्मीज फार्म फ्रेश वेजिटेबल या ब्रांड खाली नवीन व्यवसाय उभा केला,अनेक मुळे आणि मुलींना रोजगार मिळाला यासाठी ठाणे मुलुंड कळवा या भागात सुमारे १००० ग्राहकांना थेट ताजा व कापलेला भाजीपाला घरपोहोच दिला जात होता.
अशा अनेक विध व्यवसाय यशस्वीपणे कार्यरत होते तरी सुद्धा त्यांचे मूळ असलेल्या शेतीच्या प्रेमाने व ओढीने त्या शेवटी आपल्या मूळ गावी परतल्या व त्या ठिकाणी नैसर्गिक शेतीचा सन २०१८ साली श्री गणेशा केला.राहण्यासाठी पर्यावरण पूरक मातीचे शेतघर निर्माण करून तेथून आनैसर्गिकपला शेतीचा व्यवसाय सुरु केला.


शेतीचे प्रयोग

आम्ही आता एकल पिक पद्धतीचा त्याग केला असून बहुपीक पद्धत, आंतरपीक पद्धत सुरु केली आहे आता आम्ही आमच्या शेतात जीवनावश्यक पिकांचा समावेश केलेला आहे त्या मध्ये हंगामी पिके.हंगामाप्रमाणे या झाडांना नियमित आणि उत्कृष्ठ प्रकारचे फळे १२ महिने मिळत राहतात.
आमचा उद्देश
१) सौ.लक्ष्मी मोरे यांचा कल मुख्यत्वे करून जमिनीचे पोत सुधारणे,जमिनीचा कर्ब वाढवणे हा असून त्यासाठी हिरवळीचे खते,शेतातला काडी कचरा कुजवणे,पूर्व पिकाचे अवशेष,मुळे जमिनीत कुजवणे इत्यादी पद्धती.
२) सभोवतालच्या शेतकऱ्यांचा समावेश
नाविन्य पूर्ण केलेली कामे
शेतकरी उत्पादन कंपनी,कृषी विभाग नासिक – नैसर्गिक शेती ट्रेनर,श्री श्री रविशंकर कृषी (SSIAST) – मास्टर ट्रेनर (नैसर्गिक शेती),गायींचे गोदान,देशी बियाणे संवर्धन.
सामाजिक कामे
सौ लक्ष्मी मोरे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणासाठी मोलाचे योगदान असून मुलींसाठी आणि मुलांसाठी आजपर्यंत बागलाण तालुक्यामध्ये ७ शाळांमध्ये सुंदर आणि पर्यावरणपूरक स्वच्छता गृह बांधून कार्यरत केलेले असून या शिवाय संगणक प्रयोगशाळा सुद्धा निर्माण केलेल्या आहेत त्याचा फायदा ग्रामीण विद्यार्थी घेत आहेत.

समाज माध्यमे आणि महाराष्ट्र शासन यांनी घेतलेली दखल व पुरस्कार

१ जिजामाताकृषिभूषण पुरस्कार सन २०२२ महाराष्ट्र शासन.
२ आदर्श शेतकरी पुरस्कार महाराष्ट्र शासन,नासिक कृषी विभाग (आत्मा).
३ लोकमत एक्सलन्स सुर्यादत्त अवार्ड.
४ डायनामिक सोशल लीडर अवार्ड महनीय राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सम्मान.
५ उद्योगश्री पुरस्कार नाविन्य पूर्ण व्यवसाय,घराण्यातील पहिली उद्योजक महिला सन्मान पुरस्कार
६ कृषी रत्न पुरस्कार लोकमत दैनिक नासिक.
७ अटल भूषण पुरस्कार अटल फौंडेशन,नवीदिल्ली.
शासन स्तरावरील शेतकरी अभ्यास दौरे
सन २०२६ या वर्षी महाराष्ट्र शासन पुरस्कृत शेतकरी अभ्यास दौरा माहे १७ जानेवारी २०२६ ते २९ जानेवारी या कालावधीत पूर्ण केलेला आहे.या दौऱ्यामध्ये तीन देशांना भेटी दिल्या असून हा दौरा यशस्वी रित्या पूर्ण केलेला आहे .

Contact: [email protected]

  • Work
    • Madhu laxmi Natural Farmers Co