Marathi Sahitya

Volunteer, Small Business Owner, and Social Media Manager in Pune, Maharashtra, India

Visit my website

साहित्य म्हणजे प्रवास.. प्रवास उगमापासून - अस्ता पर्यंतचा , भाषेपासून -भावने पर्यंतचा. आणि ह्या साहित्याची जननी असलेल्या मराठीला अगदी कुमाग्रजांपासून ते आत्ताच्या नवलेखकांपर्यंत मराठीवर प्रेम करणाऱ्या या तुम्हा आम्हा साहित्यिकांनी समृद्ध केल आहे. जशी ही भाषा साहित्यिकांच्या लिखाणाने समृद्ध होते तशीच तिला लाभलेल्या ह्या प्रचंड वाचक परंपरेने ही होते. साहित्याला वाचकांची दाद मिळाल्याशिवाय साहित्य पूर्ण झालं असं कधीच म्हणता येणार नाही. साहित्याला वाचक, रसिकांपर्यंत पोहचवणे ह्याच कल्पनेमधून मराठीसाहित्य.कॉम ची निर्मिती झाली ,आज साहित्यिकांना त्यांच्या वाचक रसिकांपुढे पोहोचवण्याचे काम मराठी साहित्यच्या माध्यमातून सतत चालू आहे आणि यापुढेही राहील.