• Get started for freeGet your page
  • Features
  • Pricing
  • Log In
  • Home
  • Features
  • Pricing

Mrs. Mohana Natu - Babhale

Teacher and Kirtankar in Pune, Maharashtra, India

Call +918600158495

नमस्कार! मी सौ. मोहना नातू - बाभळे.

मराठी व संस्कृत या भाषांचा अभ्यास आणि अध्यापन, कीर्तन व त्यातून भारतीय सांस्कृतिक परंपरेचा प्रसार, तसेच शास्त्रीय संगीत — ही सर्व माझ्या आवडीची आणि कार्याची क्षेत्रे आहेत. या विषयांशी माझा संबंध केवळ शैक्षणिक किंवा व्यावसायिक नाही; तर त्यामध्ये मला आनंद, प्रेरणा आणि समाधान मिळते.

📚 शैक्षणिक पार्श्वभूमी:

  • M. A. (संस्कृत, वेद) - पुणे विद्यापीठ
  • B. Ed. (संस्कृत, मराठी, संगीत) - पुणे विद्यापीठ

🎤 कीर्तन साधना:

  • कीर्तन विशारद - श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा, पुणे (३ वर्षे)
  • वासंतिक कीर्तन विशारद - श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा, पुणे (५ वर्षे)
  • ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन प्रशिक्षण चालू आहे.
  • २०२१ मध्ये ‘सह्याद्री वृत्तवाहिनी’वर ‘युवा कीर्तनकार’म्हणून 'कीर्तनसखी' या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित.

🎶 शास्त्रीय संगीत शिक्षण:

  • मध्यमा पूर्ण - गंधर्व महाविद्यालय, पुणे
  • सुगम संगीत विशारद - श्रुती संगीत विद्यालय, पुणे

सध्या मी पुण्यातील एका माध्यमिक शाळेत सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत आणि मराठी या विषयांचं अध्यापन करते. मी शाळेतील सांस्कृतिक आणि संगीत विभागात सुद्धा कार्यरत आहे.

आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये भारतीय संस्कृती, संतपरंपरा, रामायण, महाभारत, संस्कृत साहित्य व त्याचे रचनाकार, अग्निहोत्र आणि इतर सांस्कृतिक-आध्यात्मिक विषयांवर मी कीर्तनसेवा सादर केली आहे.

प्रत्येक कीर्तन माझ्यासाठी एक नवीन अनुभव असतो. श्रोत्यांशी संवाद साधताना केवळ ज्ञानच नव्हे, तर आपुलकी, श्रद्धा आणि संस्कार यांची सुद्धा देवाणघेवाण होते.

about.me