Happy-Birthday -Jaan

जीवघेणी स्पर्धा, कठीण क्षण
चोहीकडे गर्दी आणि त्रासलेले मन...
खूप सऱ्या अपेक्षा आणि ओझ त्या पूर्ण करण्यासाठी
प्रत्येक वाटेवर खाचखळगे आयुष्य सुखाने जगण्यासाठी..

आयुष्यातली प्रत्येक वाट अशीच
कधी वळणावळणाची, कधी त्रासाची, कधी त्यागाची...
मी तुझ्यासाठी यातले काहीच करू शकणार नाही बहुदा
पण एक मात्र नक्की करीन
आठवण ठेवीन तुझ्या सोबतीची आणि त्या क्षणाची
अन मन मोकळी ठेवीन...मोकळी ठेवीन वाट मी माझ्या मनाची