Sayali Rajadhyaksha

मी मुंबईत राहणारी एक गृहिणी असून मला स्वयंपाकात वेगवेगळे प्रयोग करायला आवडतं. मूळची औरंगाबादची असल्यानं मुख्यतः चटपटीत खाणं प्रिय आहे. पण असं असलं तरी सगळ्या प्रकारचं कुझिन आवडतं. स्वतः शाकाहारी असले तरी मांसाहारी पदार्थही तितक्याच प्रेमानं बनवते. म्हणूनच मी जे प्रयोग करते ते इतरांबरोबरही शेअर करावेत असं मला वाटल्यानं मी हा ब्लॉग सुरू केला आहे.

स्वयंपाक करणं हे माझं पॅशन आहे. पण त्याचबरोबर मला वाचन, संगीत आणि सर्व प्रकारचे चित्रपट बघायला आवडतं, प्रवास करायला आवडतो. विशेषतः संपूर्ण युरोप पालथा घालायला मला आवडेल. व्यंकटेश माडगूळकर, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, प्रकाश नारायण संत, आशा बगे हे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. शिवाय कित्येक कवीही. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच मला हिंदी चित्रपट संगीत आणि मराठी भावगीतंही तितकीच प्रिय आहेत.