Sayali Rajadhyaksha

मी सायली राजाध्यक्ष. मुंबईत राहाते. मुख्यतः गृहिणी आहे. स्वयंपाक करणं आणि लोकांना खाऊ घालणं, अर्थातच स्वतःही खाणं, हे माझं पॅशन आहे. मी मूळची मराठवाड्यातल्या बीड या गावची. नंतरच्या काळात औरंगाबादला राहिलेली आणि लग्नानंतर मुंबईत आलेली. शिवाय माहेरची देशस्थ आणि सारस्वताशी लग्न झालेली. त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही प्रकारचा स्वयंपाक करते. पण मी मात्र शाकाहारी आहे.

मला स्वतःला फार वाटण-घाटण असलेला कुटाण्याचा स्वयंपाक रोज करायला आवडत नाही. त्यामुळे सोपे, सुटसुटीत, रोजच्या जेवणातले पदार्थ असंच या पेजचं स्वरूप आहे. अर्थात सणावाराला पारंपरिक स्वयंपाक करायला आवडतो. त्यामुळे त्या-त्या सणाला तुम्हाला या ब्लॉगवर सणांचे पदार्थ हमखास सापडतील.

फूडब्लॉगशिवाय मी एक ऑनलाईन डिजिटल अंक संपादित करते. तो अनियतकालिकाच्या स्वरूपात वर्षातून तीनदा निघतो. मला प्रवासाची, खाण्याची, वाचनाची, संगीताची, एकूणच आयुष्याचा भरभरून आनंद घेण्याची जबरदस्त आवड आहे.