vibhavari Deshpande

मी कोण ? असा प्रश्न पडला असेल ना ?

मी तुमच्या आमच्यातलीच एक..

थोडीशी विचारी आणि खूपशी हळवी..

कधी मुक्त खळाळत्या निर्झरासारखी चंचल अवखळ..

तर कधी ओहोटीच्या समुद्रा सारखी शांत, आत्ममग्न..

कधी धारे विरुद्ध जाणारी राधा..

तर कधी ‘आलीय भोगासी असावे सादर..’ म्हणत आल्या परिस्थितीला स्विकारणारी..

थोडीशी ‘बावरी’ मी विभावरी !

नाव विभावरी देशपांडे. व्यवसायाने Japanese English Bilingual.

हा ब्लॉग म्हणजे माझी डायरी.. माझं व्यक्त होण्याच ठिकाण.

इंटरनेटच्या आभासी जगातला माझा गप्पांचा कट्टा..