Vishal Babar
Satara
मी Vishal(Vishu) एक साधा आणि सरळ मुलगा.... स्वतःबद्दल.. सांगायचे झाल्यास मनाला वाटलं तरचं हसायचं,बोलायचं, नाहीतर गप्प बसायचं. एकांतात रहायला खुप आवडते. आतापर्यंतच्या माझ्या छोटयाश्या आयुष्याने मला भरपुर काही शिकवलं त्यामुळे कुठलीही गोष्ट निवडताना डोक दुखेपर्यंत विचार करतो॰ मैत्रीचं म्हणाल तर मला मैत्री करायला खुप आवडते पण ओढुन-ताणुन मैत्री करण्यात काय अर्थ..जर व्हायची असेल तर आपोआपच होवुन जाते खुप सारी स्वप्नं आहेत मनात ,पुर्ण करण्याच्या निर्धारासोबतच चालायचे माझं असं मत आहे, की जोपर्यंत जो आनंद घेता येतो किंवा एखादा क्षण मनापासुन् जगता येतोय तर जगुन घ्यायचा.जास्त विचार नाही करायचा मला स्वच्छंद जगायला आवडतं,जीवनाच्या उंच आकाशात पारव्यागत भिरभिरावसं वाटत. अजुन काय सांगु... थोडासा हळ्वा आहे, थोडासा हट्टी आणि खुपचं वेगळा आहे वेगळा पण जगावेगळा नाही बरं का?. From Vishal